“माझे हि २० रुपये माझ्याच लोकांसाठी”

आम्ही #विधायक_भारती संस्था #नंदुरबार इथल्या #धडगाव तालुक्यामधील १० गावे आणि ३० आदिवासी पाड्यांवर #बाल_अधिकार आणि #बाल_संरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन १९६६ कुटुंबातील #मुलं आणि #किशोरवयीन #मुलींसोबत काम करीत आहोत. आताच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आम्ही गावातील या लोकांसोबत काम करतांना आलेल्या अनुभवातून त्यांना कशा प्रकारे सहाय्य करता येईल या बाबत सर्व संवेदनशील नागरिकांना सहयोगाचे आवाहन केले होते, आम्हाला अनेकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद यासाठी दिला.

परवा एका १२ वर्षाच्या मुलाचा मला फोन आला….त्याचे नाव घेणे या ठिकाणी इष्ट होणार नाही…. ६ वीत शिकतोय म्हणाला…आम्ही केलेले आवाहन त्याच्या वाचनात आले…..आमच्या ओळखीतल्या व्यक्तीकडून तो मेसेज त्याच्या कुटुंबापर्यंत पोचला होता….त्याने माझा नंबर मिळवला आणि त्याने मला संपर्क केला…. तो मला म्हणाला….माझ्या कडे काही पैसे साठविले आहेत……सगळे मिळून २० रुपये आहेत… मला ते तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही माझ्या सारख्या मुलांसाठी काम करता आहात हे मला माझ्या घरातून कळले…..तुम्ही प्लीज हे २० रुपये घेणार का? काय सांगू मी तुम्हाला…. माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं…..

एक चिमुकला संवेदनशील पणे आपलाही सहभाग या पद्धतीने देतोय या आपत्तीच्या काळात….हे चित्र खूप सकारात्मक आहे… संवेदनशील पिढी घडवणं आपल्याच हातात आहे…आमच्या साठी हे २० रुपये सर्वोच्च योगदान आहे…..आपण या परिस्थितीतून नक्की बाहेर येणार….हा विश्वास आणखीन बळावला…..#धन्यवाद_छोट्या_मित्रा…तू कायम आमच्या सर्वांच्या स्मरणात असशील……लवकरच भेटूयात….आता वेळ आहे आपली जबाबदारी पार पाडण्याची…चला..तर…. मग….

लेखन: #संतोष_शिंदे

सहकार्य करण्या साठी

बँक ट्रान्सफर साठी

Account Holder: Vidhayak Bharti
Account No.: 34753067976
IFSC Code: SBIN0006055
Branch:  Gokuldham (Goregaon-E)